मॅट्रिकपूर्व शिष्यवत्ती योजना सन 2023-2024 पासून महाडीबीटीद्वारे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवत्ती योजना सन 2023-2024 पासून

महाडीबीटीद्वारे ऑनलाईन पध्दतीने  सादर करण्याचे आवाहन

 

लातूर, दि.15,(जिमाका) : अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकपूर्व शिष्यवत्ती योजना सन 2023-2024 पासून महाडीबीटीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असल्याबाबत पुणे समाज कल्याण आयुक्तालयाने कळविले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना http://prematric.mahiti.org/Login/Login पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे तथा गरजू विद्यार्थ्यांना लेखन शैक्षणिक साहित्य खरेदी करणे शक्य व्हावे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुला - मुलींना पहिली ते दहावी शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्य अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण फी इत्यादी योजनाचे सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज, महाडीबीटी प्रणालीवर भरण्याचे आवाहन सर्व मुख्याध्यापकांना करण्यात आले आहे. हे प्रस्ताव सादर करतांना एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु