मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार

 

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार

लातूर, दि. 8 (जिमाका): अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकपूर्व शिष्‍यवृत्‍ती योजनेचा लाभ 2023-24 पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार असल्याची माहिती समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी दिली आहे.

मॅट्रीकपूर्व शिष्‍यवृत्‍ती योजनेमध्‍ये सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता, इयत्ता नववी, दहावीमध्‍ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍यांना मॅट्रीकपूर्व शिष्‍यवृत्‍ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्‍या पाल्‍यांना मॅट्रीकपूर्व शिष्‍यवृत्‍ती, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावीमधील अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍यांना सावित्रीबाई फुले शिष्‍यवृत्‍ती, माध्‍यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, महर्षि विठठल रामजी शिंदे शिक्षण शुल्‍क परिक्षा शुल्‍क योजना आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे.

या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीद्वारे तत्काळ नोंदणी करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांनी आवश्यक कार्यवाही करावी. एकही विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचीत राहणार नाही किंवा याप्रकरणी कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन श्री. देवसटवार यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु