ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

·        23 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

लातूर, दि. 8 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी ते जून 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, नवनिर्मित व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे 30 जानेवारी 2024 अखेर रिक्त झालेल्या सदस्य, थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी संगणकीकृत पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

यासाठी 23 जानेवारी 2024 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध होईल. 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु