‘खेलो इंडिया’ अंतर्गत लातूर येथे मुला-मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण निवड चाचणीचे आयोजन

 

‘खेलो इंडिया’ अंतर्गत लातूर येथे मुला-मुलींसाठी

कुस्ती प्रशिक्षण निवड चाचणीचे आयोजन

लातूर, दि. 29 (जिमाका): भारतीय खेल प्राधिकरण व राज्य शासनाचे क्रीडा युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 5 मार्च, 2024 रोजी खेलो इंडिया कुस्ती केंद्रामध्ये मुला-मुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या खेलो इंडिया कुस्ती केंद्रात मोफत कुस्ती प्रशिक्षण देण्यात येत आहे. या निवड चाचणीद्वारे नियमित कुस्ती प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या प्रतिभा संपन्न अनिवासी कुस्ती खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे, तरी लातूरमधील कुस्तीगिरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

या चाचणीसाठी येताना जन्मतारखेचा दाखला, दोन फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र (असल्यास) सोबत आणावे. अधिक माहितीसाठी लातूरचे खेलो इंडिया कुस्ती मार्गदर्शक चेतन संभाजी जावळे (भ्रमणध्वनी क्र. 9960159798) यांच्याशी संपर्क साधावा. या चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. लकडे यांनी केले आहे.

उपलब्ध सुविधा

प्रशस्त मॅट हॉल, क्रीडा साहित्य सोई-सुविधायुक्त भव्य क्रीडांगणयुक्त खेलो इंडिया कुस्ती केंद्र. अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शास्त्रशुध्द तंत्र प्रशिक्षण.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु