सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील गट-क पदांची भरती

 सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील गट-क पदांची भरती

लातूरदि. 9 (जिमाका): सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची गट-क पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर 12 फेब्रुवारी2024 रोजी सकाळी 11 पासून 3 मार्च2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील.

 कल्याण संघटक -40 , वसतिगृ‍ह अधीक्षक -17कवायत प्रशिक्षक -01शारिरिक प्रशिक्षण निदेशक -01 गट क या पदांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षीका गट-क तीन पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदापैकी 01 हे पद दिव्यांग संवर्गातून किमान 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांकडून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता आणि उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु