‘एनएसएफडीसी’ योजनेतंर्गत सुविधा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

*‘एनएसएफडीसी’ योजनेतंर्गत सुविधा कर्ज योजनेसाठी* *ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन* लातूर, दि. 15 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षात एनएसएफडीसी योजनेतंर्गत सुविधा कर्ज योजना अंतर्गत 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना अंतर्गत 1 लाख 40 हजार रुपये, महिला समृध्दी योजना अंतर्गत 1 लाख 40 हजार रुपये यासह शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील दारिद्र्य रेषाखालील महिला आणि पुरुष स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देणे हा या योजनांचा उद्देश आहे. या योजनांचे प्रस्ताव https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर दिनांक 5 मार्च, 2024 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, हे संकेतस्थळ 5 मार्चनंतर बंद होईल. मातंग समाजातील गरजू शहरी, ग्रामीण भागातील लाभार्थी, तसेच परितक्ता, विधुर, दिव्यांग, निराधार व्यक्तींना या योजनेसाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्यांनी https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे अर्ज करुन एक प्रत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग , तळमजला, लातूर येथील कार्यालयात येवून संपर्क साधावा, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु