स्पेशल ऑलिम्पिक राज्य स्पर्धेत लातूरच्या दिव्यांग खेडाळूंच्या संघाला सहा पदके

 

स्पेशल ऑलिम्पिक राज्य स्पर्धेत

लातूरच्या दिव्यांग खेडाळूंच्या संघाला सहा पदके

जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी खेळाडूंचे केले कौतुक



लातूर
, दि. 5 (जिमाका): नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या दिव्यांग संघाने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कास्य पदक असे एकूण 6 पदके पटकावली. बौध्दीक असक्षम असणाऱ्या या दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघीक क्रीडा प्रकारात लातूर जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करीत एकूण 6 पदके पटकावली आहेत.

लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, मतिमंद विद्यालय या शाळेतील एकूण 11 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. रवि कवटे याने गोळा फेक

, राजू पवार याने वेटलिफ्टिंग, तर हरिष पुरी यांने स्पॉटजंप प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. यश ‍गिरीने भालाफेक व ऊसबअली शेखने व्हॉलीबॉल खेळात रौप्य पदक पटकावले आहे. टेबल टेनीस क्रीडा प्रकारात विठ्ठल भोरे याने कास्यपदक मिळवीले आहे.

लातूर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंच्या चमूने या राज्य स्पर्धेत 6 पदके पटकावित यश ‍मिळवीले आहे. सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंची स्पेशल ऑलंम्पिक राष्ट्रीय स्पर्धेसाठी ‍निवड झाली आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून तुकाराम शिरसाठ, शिवदास लोखंडे, अतुल बेडके यांनी काम पाहिले आहे. यशस्वी खेडाळूंचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सक्षम जिल्हा सचिव बस्वराज पैके, संस्था अध्यक्ष अण्णासाहेब कदम, मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारी, कार्यालयीन अधीक्षक राम वंगाटे, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यावेळी उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु