पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार नोंदणी आणि दुरुस्तीची सुविधा

 

पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार नोंदणी आणि दुरुस्तीची सुविधा

लातूर, दि. 28 (जिमाका): धाराशिव डाक विभागातील लातूर मुख्य डाकघर कार्यालयातंर्गत 11 पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधारकार्ड व आधारकार्ड अद्ययावत (अपडेट) करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्राद्वारे नवीन आधारकार्ड तसेच आधारकार्डधारकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, फोटो अद्ययावत करण्यात येतात. भारत सरकारच्या नवीन नियमानुसार ज्या व्यक्तींनी त्यांचे आधार 10 वर्षे किंवा त्याहून आधी काढले किंवा अपडेट केले आहे, त्यांनी आधार अपडेट करणे आवश्यक आहे.

लातूर जिल्ह्यात लातूरमध्ये गांधी चौक येथील प्रधान डाकघर, मुरुड पोस्ट ऑफिस, किल्लारी पोस्ट ऑफिस, अहमदपूर पोस्ट ऑफिस, देवणी पोस्ट ऑफिस, उदगीर पोस्ट ऑफिस, औराद शहाजनी पोस्ट ऑफिस, औसा ऑफिस, चाकूर पोस्ट ऑफिस, निलंगा पोस्ट ऑफिस, टिळकनगर पोस्ट ऑफिस या धाराशिव डाक विभागाच्या लातूर अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार अद्ययावत केंद्र सुरु आहेत. तरी नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन धाराशिव विभाग मुख्यालय लातूरचे डाक अधीक्षक एस. एन. अंबेकर यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु