देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याकरिता शेतकऱ्यांच्या निवडीसाठी 5 फेब्रुवारी रोजी सोडत

 

देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याकरिता

शेतकऱ्यांच्या निवडीसाठी 5 फेब्रुवारी रोजी सोडत

लातूर, दि. 3 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, विकसित होत असलेले तंत्रज्ञान याबाबत माहिती घेण्यासाठी भारताबाहेरील देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी याच्याशी प्रत्यक्ष भेटीची, तसेच संस्थांना भेटी देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी परदेशात अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाणार असून यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोडत आयोजित करण्यात आली आहे.

देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी तालुका स्तरावरुन इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. या प्रस्तावांची संख्या जिल्ह्यासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त असल्यामुळे पात्र ठरविलेल्या प्रस्तावांची सोडत 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या सोडतीसाठी लातूर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु