चर्मकार समाजातील युवक-युवतींना स्वंयरोजगाराची संधी

 चर्मकार समाजातील युवक-युवतींना स्वंयरोजगाराची संधी

§  इच्छूक लाभार्थ्यांनी 21 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर, दि. 9 (जिमाका):  लिडकॉम आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वंयरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे वर्षात 25 हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळेल. या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजनावित्त व्यवस्थापनउत्पादन प्रक्रियाविपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयांचा समावेश असेल.तरी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक युवक-युवती, महिलांनी 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महामंडळाच्या योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल. 2023-2024 या अर्थिक वर्षात लातूर जिल्ह्यातील चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींनी आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा तथा अधिक माहिती घेण्यासाठी लिडकॉम किंवा एमसीईडी. यांच्या लातूर येथील जिल्हा कार्यालयाला भेट द्यावीअसे आवाहन लिडाकॉम जिल्हा व्यवस्थापक आर. टी. जिभकाटे यांनी केले आहे.

जिल्ह्यात सुरु होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना एमसीईडीचे दीपक गायकवाड यांनी सांगितले कीफेब्रुवारी महिन्यात 18 दिवसांचा उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम होणार असून प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. लातूर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील चांभारढोरहोलार व मोची या जात प्रवर्गातील युवक-युवतींनी 21 फेब्रुवारी, 2024 तारखेपर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 9325717499)लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे (भ्रमणध्वनी क्र. 9049049268) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु