स्त्री रुग्णालय लातूर आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची भेट

 

स्त्री रुग्णालय लातूर आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला

मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची भेट

लातूर, दि. 2 (जिमाका): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आज लातूर स्त्री रुग्णालय आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी स्त्री रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, एसएनसीयु विभाग व एनआरसी विभागाची पाहणी केली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रवींद्र भालेराव यावेळी उपस्थित होते.

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात नोंदणी विभाग, बालरोग तज्ज्ञ विभाग, दंत विभाग, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट विभाग, सामाजिक कार्यकर्ता व प्रयोगशाळा, फिजिओथेरपिस्ट विभाग, मानसशास्त्र विभाग, नेत्र विभाग, विशेष शिक्षक विभाग, ईईजी विभागाची पाहणी केली. तसेच येथील रुग्णांच्या पालकांना असलेल्या अडचणींबाबत आढावा घेतला.

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील आरोग्य सेवेचा गरजू रुग्ण, मतीमंद बालक, कर्णबधीर बालक, स्वमग्नता असलेले बालक, वाकडे पाय, फाटलेले ओठ अथवा टाळू, जन्मजात असणारा मोतीबिंदू, जन्मजात असणारे हृदयाचे रोग, जन्मजात असणारा बहिरेपणा, जन्मजात असणारा तिरळापणा, कुपोषित बालके, वाचादोष, श्रवणदोष, दृष्टीदोष, बौद्धिक अक्षमता, अध्ययन अक्षमता, दातांचे विकार असणाऱ्या रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सागर यांनी यावेळी केले.

*****

 






Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु