कुष्ठरोग जनजागृतीसाठी 'रन फॉर लेप्रसी रॅली'चे आयोजन

 


कुष्ठरोग जनजागृतीसाठी
 'रन फॉर लेप्रसी रॅली'चे आयोजन

लातूर, दि.15,(जिमाका) :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जागतिक कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त जिल्ह्यात दिनांक 30 जानेवारी, 2024 पासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. दरवर्षी दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवाडा साजरा करण्यात येतो आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवाड्यामध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृतीसाठी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन कुष्ठरोग विषयी शास्त्रीय माहिती समाजामध्ये देण्यात येत आहे. या वर्षीच्या स्पर्श जनजागृती अभियानचे घोषवाक्य 'कलंक कुष्ठरोगाचा मिटवूया, सन्मानाने स्विकार करुया' हे आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा निमित्त समाजामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी  लातूर शहरातील संत नामदेव विद्यालय येथे 'रन फॉर लेप्रसी रॅली'चे 12 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. 

या रॅलीद्वारे घोषवाक्य, पोस्टर, बॅनर व महात्मा गांधी यांच्या वेशभुषेत नुक्कड नाटक सादर करुन कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांना कुष्ठरोगाबाबतची शास्त्रीय माहिती देण्यात आली. 

रन फॉर लेप्रसी रॅली पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. ढेले, सहायद्ययक संचालक आरोग्य सेवा (वैद्यकीय) उपसंचालक आरोग्य सेवा परीमंडळ कार्यालयाच्या डॉ. प्रीती बादाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

या कार्याक्रमास सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. विद्या गुरुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे, एडीएचओ डॉ. पडंगे, आरएमओ डॉ. अशोक सारडा, आरएमओ डॉ. मोनिका पाटील, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती, वैद्यकीय विशेषज्ञ डॉ. हरीदास , वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण , वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद बिलापट्टे  शाळेचे संस्थाचालक श्री. परगे व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयाचे कर्मचारी तसेच शिक्षक उपस्थित होते.

***

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु