टपाल विभागाच्या महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजनेबाबत होणार जनजागृती

 टपाल विभागाच्या महिला सन्मान बचतपत्र,

सुकन्या समृद्धी योजनेबाबत होणार जनजागृती

लातूरदि. 29 (जिमाका): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने महिला सशक्तीकरण अंतर्गत आणि महिलांचा गुंतवणूकीत सहभाग वाढविण्यासाठी महिला सन्मान बचत पत्र  (व्याजदर 7.50 टक्के) नवीन बचत योजना सर्व पोस्ट ऑफिसमार्फत सुरु केली आहे. तसेच मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृध्दी योजना (व्याजदर 8.20 टक्के) सुरु केली आहे. या दोन्ही योजनांची जनजागृती करण्यासाठी अधीक्षक डाकघर धाराशिव विभागमुख्यालय लातूर यांच्याकडून 1 ते 8 मार्च2024 या कालावधीमध्ये संपूर्ण लातूर जिल्हातंर्गत सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात वेळापत्रक बनवून जनजागृती मेळावे आयोजित केले आहेत. अभियानांतर्गत संपूर्ण योजनेची माहिती देणेघरोघरी पोस्ट ऑफिस योजना पोहोचविणेपात्र लाभार्थी यांचे तात्कार नवीन खाते उघडणे इत्यादी  सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व महिलांनी या  योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन धाराशिव विभागमुख्यालय लातूरचे अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु