विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 5 मार्च पर्यंत अर्ज करावेत

 विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 5 मार्च पर्यंत अर्ज करावेत

लातूर दि. 19 (जिमाका): विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यात 100 मुलासांठी आणि 100 मुलींसाठी अशी दोन वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 20 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील.

लातूर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी 1 व मुलींसाठी 1 असे एकूण दोन वसतिगृह सन 2023-24 पासून सुरु करण्यात आली आहेत. प्रवेश अर्ज इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात निशुल्क उपलब्ध आहेत.

वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छूक असलेल्या इतर मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 20 फेब्रुवारी, 2024 ते मार्च, 2024 या कालावधीत आपले अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजुनी डालडा फॅक्ट्रीगुळ मार्केटलातूर येथे सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु