‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत उदगीर येथे ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे आयोजन

 

‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत उदगीर येथे

‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे आयोजन

लातूर, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लातूर जिल्हास्तरावर 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान ‘महासंस्कृती महोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 पासून ‘मराठी बाणा’ आणि स्थानिक कलाकारांचे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत. उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल (जुनी जिल्हा परिषद शाळा मैदान) येथे आयोजित या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

महासंस्कृती महोत्सव अंतर्गत उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत स्थानिक कलावतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 6 ते 10 पर्यंत ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन अशोक हांडे यांचे आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु