जवाहर नवोदय विद्यालयाची शनिवारी प्रवेश परीक्षा

 जवाहर नवोदय विद्यालयाची शनिवारी प्रवेश परीक्षा

लातूरदि. 7 (जिमाका): येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीमधील रिक्त जागा भरण्यासाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. इयत्ता नववीची प्रवेश परीक्षा लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथे होणार असून 483 विद्यार्थी परीक्षा देतील. तसेच इयत्ता अकरावीची प्रवेश परीक्षा लातूर येथील माऊंट लिट झी स्कूल येथे होणार असून 84 विद्यार्थी ही परीक्षा देतील.

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठीच्या 80 जागासाठीची प्रवेश परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयात दिले जाते. परंतुइयत्ता सहावी ते आठवीपर्यंत जे विद्यार्थी विद्यालयातून आपले प्रवेश रद्द करतातत्यांच्या जागा पुन्हा इयत्ता नववीमध्ये भरल्या जातात. तसेच इयत्ता नववी दहावीतून जे विद्यार्थी विद्यालयातून आपले प्रवेश रद्द करतात. त्यांच्या जागा पुन्हा इयत्ता अकरावीमध्ये भरल्या जातात.

प्रवेश परीक्षा लेखी स्वरुपाची असून या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. परीक्षेवेळी या प्रवेशपत्राची प्रिंट घेवून येणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक पाहाव्यात. याबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी.डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु