महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलनात आज महेश काळे यांचा ‘सूर निरागस हो’ कार्यक्रम

 

महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलनात आज महेश काळे यांचा ‘सूर निरागस हो’ कार्यक्रम

·         ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ आणि ‘बॅरिस्टर’ नाटक होणार सादर

·         बालनाट्य व नाट्यछटा महोत्सव, एकांकिका महोत्सवाचे आयोजन

लातूर, दि. 14 (जिमाका): राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित विभागीय 100 वे नाट्य संमेलनाचा आज, 15 फेब्रुवारी 2024 रोजी समारोप होत आहे. या अंतर्गत सायंकाळी 7 वाजता दयानंद महाविद्यालय मैदान येथे ‘सूर निरागस हो’ हा सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्थानिक कलाकारांच्या नृत्य व संगीताचा कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

दयानंद सभागृह येथे सकाळी 10 पासून बालनाट्य व नाट्यछटा महोत्सव आणि सायंकाळी 7 वाजता मुक्काम पोस्ट आडगाव हे व्यावसायिक नाटक आयोजित करण्यात आला आहे.

दगडोजीराव देशमुख सभागृह येथे सकाळी 10 पासून एकांकिका आणि एकपात्री महोत्सव होणार असून रात्री 8 वाजता ‘बॅरिस्टर’ हे नाटक सादर होईल. या सर्व कार्यक्रमांना निशुल्क प्रवेश असून यासाठी प्रवेशिकेची आवश्यकता नाही, असे जिल्हा प्रशासन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या लातूर शाखेने कळविले आहे.

***** 




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु