देवणी येथे 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन

 देवणी येथे 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन

लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी येथे सोमवार, 4 मार्च 2024 रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पशुधन व कुक्कुट गटांची नोंदणी 4 मार्च रोजी प्रदर्शनस्थळी सकाळी 11 नंतर केली जाणार आहे. तसेच सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंतचा वेळ पशुधन निवडीसाठी राखीव असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.

पशुसंवर्धनामध्ये सहभागी होण्यासाठी पशुधनाचे लंपी चर्मरोगाचे रोगप्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र व सक्षम प्राधीका-यांचे स्वस्थ दाखला प्रमाणपत्र घ्यावे. लंपी चर्म रोग किंवा इतर कोणताही रोग नसलेबाबत पशुपालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथमद्वितीयतृतीय व अड अशाप्रकारे बक्षीस वाटप करण्यात येईल. प्रत्येक गटात दहा पशुधनाचा सहभाग बंधनकारक राहील अन्यथा तो गट होणार नाही व त्या गटातील पशुधनास ग्रेडप्रमाणे अड याप्रमाणे बक्षीस वाटप करण्यात येईल. सर्व सहभागी पशुपालकांना बक्षीसाची रक्कम ही संगणक प्रणाली (आर.टी.जी.एस.) द्वारे अदा करण्यात येईल. त्यासाठी नोंदणी करतांना पशुपालकांचे आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सलसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व पशुधंनाचा दाखला देणे बंधनकारक राहील. कुठल्याही परिस्थितीत बक्षिसाची रक्कम ही रोख स्वरुपात दिली जाणार नाही.

पशुपालकांनी आपली बहुमोल पशुधन व्यवस्थित दोरखंडाने बांधुन आपल्या जबाबदारीने आणावे.  निवड प्रक्रिया ही पारदर्शक असून निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. निवड समितीमधील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत अथवा वाद घालणे, यासारखा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित पशुपालकांची नोंदणी रद्द करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत सर्वोत्तम पशुधन (चॅम्पियन)ची निवड केलीजाणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.                                                                        

असे राहतील पशुधनाचे गट

देवणी नर गट 

1) देवणी नर 1 वर्षाखालील वासरे गट

2) देवणी नर 1 वर्षावरील वासरे गट

3) देवणी नर 2 दात वळू गट

4) देवणी नर 4 दात वळू गट

5) देवणी नर 6 दात वळू गट

 

देवणी मादी गट –

1) देवणी मादी 1 वर्षाखालील वासरे गट

2) देवणी कालवड गट

3) देवणी गाभण गाय गट

4) देवणी गाय / दुधाळ गट

           

लालकंधारी नर गट  

1) लालकंधारी नर 1 वर्षाखालील वासरे गट

2) लालकंधारी नर 1 वर्षावरील वासरे गट

3) लालकंधारी नर 2 दात वळू गट

4) लालकंधारी नर 4 दात वळू गट

5) लालकंधारी नर 6 दात वळू गट

 

लालकंधारी मादी गट -       

1) लालकंधारी मादी 1 वर्षाखालील वासरे गट

2) लालकंधारी कालवड गट

3) लालकंधारी गाभण गाय गट

4) लालकंधारी गाय / दुधाळ गट

 

संकरित मादी गट -   

1) संकरित मादी 1 वर्षाखालील वासरे गट

2) संकरित कालवड गट

3)  संकरित गाभण गाय गट

4) संकरित गाय / दुधाळ गट

 

अश्व गट 

1) अश्व नर गट

2) अश्व मादी गट

 

कुक्कुट गट 

1) देशी कोंबडी गट

2) विदेशी  कोंबडी गट

 

उस्मानाबादी शेळी गट 

1) तिन पिल्ले व त्यावरील पिलांची उस्मानाबादी शेळी गट

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु