अनाथ मुलांना प्रमाणपत्र वितरणासाठी ५ मार्चपर्यंत विशेष पंधरवडा

 

अनाथ मुलांना प्रमाणपत्र वितरणासाठी ५ मार्चपर्यंत विशेष पंधरवडा

 

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वंतत्र कक्षाची स्थापना

 

लातूर,दि.26(जिमाका): जिल्ह्यातील अनाथ बालकांना 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेच्या माध्यमातून विविध शासकीय प्रमाणपत्रे वितरीत करण्यासाठी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च, 2024 या कालावधीत विशेष पंधरवडा राबविण्यात येत आहे. यासाठी लातूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वंतत्र समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास, राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड आदी कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण राज्यासह लातूर जिल्ह्यामध्ये हा पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

लातूर येथे स्थापन करण्यात आलेल्या कक्षात जिल्हा परीविक्षा अधिकारी तथा अध्यक्ष ए.पी. खानापूरकर (मो. 8830833016), परिविक्षा अधिकारी तथा सदस्य डी. एस. जवळगे (मो. 7507592007), सामाजिक कार्यकर्ता तथा सदस्य अमर लव्हारे (मो. 8600581882), क्षेत्रीय कार्यकर्ता तथा सदस्य सुषमा कोकाटे (मो. 7559313535),  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा सदस्य सचिव डी. व्ही. कांबळे (मो. 9822137327) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील अनाथ बालकांना शासकीय कागदपत्रे प्रपत करून अडचणी उद्भवल्यास त्यांनी या नमुद समिती सदस्याशी तात्काळ संकर्प साधावा. तसेच तालुकास्तरावर अडचणी सोडविण्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी केले आहे.

लातूर तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय ईमारत पहिला मजला, लातूर असा आहे. तर औसा तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता प्रशासकीय इमारत खोली क्र. 210 अभय केंद्र औसा, निलंगा तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र निलंगा, देवणी तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र शिरुर अनंतपाळ, उदगीर तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र उदगीर, जळकोट तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र जळकोट, चाकूर तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र चाकूर, अहमदपूर तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र अहमदपूर,  रेणापूर तालुक्यासाठी कनिष्ठ संरक्षण अधिकारी कार्यालयाचा पत्ता पंचायत समिती परिसर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय अभय केंद्र रेणापूर असा आहे.

                                                            ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु