सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट, उतार रस्ता तयार करण्याचे आवाहन

 

सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी

लिफ्ट, उतार रस्ता तयार करण्याचे आवाहन

लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील विविध सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट अथवा उतार रस्ता (रॅम्प) यांची सोय उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग, शारिरीकदृष्ट्या अशक्त, आजारी, वयोवृध्द इत्यादी व्यक्तींनी दर्शनासाठी पायऱ्या चढून जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना सोई अभावी सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळे याठिकाणी ते भेटी देवू शकत नाहीत व दर्शनापासून वंचित राहतात, असे समाजातील काही हितचिंतक लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे, तसेच याबाबत लातूर धर्मादाय सहआयुक्त यांनी केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास साली आहे. तरी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट, उतार रस्ता तयार करण्याचे आवाहन धर्मदाय सहआयुक्त बंडोपंत कुलकर्णी यांनी केले आहे.

दिव्यांग, शारिरीकदृष्ट्या अशक्त, आजारी, वयोवृध्द व्यक्तींना मंदिर व धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी व दर्शनासाठी संबंधित मंदिर अथवा धार्मिक स्थळाने सोय उपलब्ध करुन दिल्यास, अशा व्यक्ती देव दर्शन व तेथे साजरा होणारे धार्मिक उत्सव यांचा लाभ घेवू शकतील. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंदिरे व धार्मिक स्थळे या ठिकाणी दिव्यांग, शारिरीकदृष्ट्या अशक्त, आजारी, वयोवृध्द नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उतार रस्ता (रॅम्प) व शक्य झाल्यास लिफ्टची सोय उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु