लातूर शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली पाहणी

 सुधारित

लातूर शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांची

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली पाहणी


लातूर, दि. 26 :
  शहरातील इंडिया नगर येथील एलआयसी कार्यालय इमारतीतील संवेदनशील मतदान केंद्रांची आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पाहणी केली. तसेच याठिकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पंकज मांदाडे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संवेदनशील केंद्रांवर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक काळात मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना कराव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारे कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.

लातूर उपविभागातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

लातूर महसूल उपविभागात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीच्या आढावा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पंकज मांदाडे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे प्रशिक्षण, साधन सामग्री सज्ज ठेवावी. भरारी पथके, स्थायी पथके याकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत. निवडणूक विषयक कामामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिलाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केल्या.

*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु