महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा
लातूर, दि. 29 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता 3 ते 4 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 3 डिसेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6-00 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथे आगमन व मुक्काम . सोमवार, दि. 4 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10-30 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय कार्यालयाचे शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर मागासवर्ग कक्ष सहाय्यक आयुक्त, शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, लातूर यांच्यासोबत पवित्र पोर्टलमार्फत प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक भरतीचा इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे याबाबतचा आढावा. दुपारी 1-00 वाजता राखीव. दुपारी 2-00 वाजता तुंगी (ता. औसा) आणि हत्तरगा (ता. निलंगा) क्षेत्रपाहणी.
*****
Comments
Post a Comment