शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

 शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता

माहिती सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि.6 (जिमाका) :  राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या 19 ऑगस्ट 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारीकर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 अद्ययावत करण्यांत येणार आहेया माहिती मध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी  नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरीलरोजंदारीवरीलअंशकालीनमानसेवी ईत्यादी), तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यांत आलेले कर्मचारी, अशा सर्व प्रकारच्या कर्मचा-यांची माहिती गोळा करण्यांत येणार आहे.

त्यानुषंगाने 1 जुलै, 2024  या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय.डीभविष्य निर्वाह निधीडी.सी.पी.एस खाते क्रमांकपॅन क्रमांकआधार क्रमांककर्मचा-याचे संपूर्ण नांवजन्मदिनांकलिंगसेवेत रुजू झाल्याचा दिनांकसेवा निवृत्तीचा दिनांकसेवेत रुजू झाल्यानंतरचे पदनामकर्मचा-यांचा भ्रमणध्वनी क्रमांककर्मचा-यांचा -मेल आय.डीसामाजिक प्रवर्गकर्मचा-याची जातधर्मस्वग्रामदिव्यांग व्यक्ती ईत्यादी स्थायी स्वरुपाची माहिती तसेच (लागू असल्याससध्याचे पदनामसध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांकआश्वासित प्रगती योजना लाभ तसेच माहे जुलै, 2024 या संपुर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशिलवार माहिती गोळा करण्यासाठी अर्थ  सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तयार करण्यांत आली आहेया आज्ञावलीत माहिती नोंदणीसाठी लॉग-इन आय.डी. व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे  आज्ञावली वापराबाबत सूचनासंच लातूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांचे मार्फत संबंधित कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यांत येतील.

कर्मचारी गणना 2024 मधील माहिती विहीत वेळेत अद्ययावत करण्यासाठी  त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाच्या आहरण  संवितरण अधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आहरण  संवितरण अधिकारी यांनी लॉग-इन  पासवर्ड उपलब्ध करुन घ्यावेत. आहरण  संवितरण अधिका-यांनी माहिती ऑनलाईन सादर करुन 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत करणे  पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.  

आहरण  संवितरण अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सादर केलेल्या माहितीमधील त्रुटींचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 3 डिसेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतप्राप्त करुन घ्यावे 

            जिल्हा सांख्यिकी अधिकारीलातूर यांचेकडून संबंधित आहरण  संवितरण अधिकारी यांना माहिती भरल्या बाबतचे पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, 2024 च्या वेतन देयकासोबत जोडण्यासाठी  भरण्यांत आलेली माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाण-पत्र माहे फेब्रुवारी, 2025 च्या वेतन देयकासोबत जोडण्यासाठी निर्गमित करण्यांत येईलपहिले  दुसरे प्रमाण-पत्र त्या त्या महिन्याच्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयके जिल्हा कोषागार कार्यालय तसेच उपजिल्हा कोषागार कार्यालयास स्विकारली जाणार नाहीत, असे शासनाचे निर्देश आहेत.

            19 ऑगस्ट, 2024 च्या शासन परिपत्रकान्वये ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हयांतील सर्व आहरण  संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करुन शासकीय कर्मचारी गणना 2024 बाबतचा माहितीकोष तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक उ. म. हत्ते यांनी केले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा