लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन लातूर, दि. ०५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित तारखेला सकाळी 10 ते सांयकाळी 2 वाजेपर्यंत प्रवासी राजा दिन आणि दुपारी 3 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत कामगार पालक दिन साजरा होणार आहे. अहमदपूर येथे 11 मार्च, 2026 रोजी, निलंगा येथे 18 मार्च, 2026, लातूर येथे 25 मार्च 2026, उदगीर येथे 1 एप्रिल 2026, औसा येथे 8 एप्रिल, 2026 रोजी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक हे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाला उपस्थित राहतील. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास