भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास 12 मार्चपर्यंत अंतिम मुदत · शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पत्र विद्यार्थ्यांना करता येईल अर्ज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास 12 मार्चपर्यंत अंतिम मुदत
· शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पत्र विद्यार्थ्यांना करता येईल अर्ज
लातूर, दि. 10 (जिमाका) : सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी http://hams.mahait.org हे नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. परंतु, वसतिगृह क्षमतेअभावी तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीमुळे वसतिगृहात प्रवेश घेवू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी त्यांचे अर्ज विद्यार्थी लॉगीनला महा-आयटीकडून परत पाठविण्यात आलेले आहेत.
तरी ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तसेच ज्यांचे अर्ज विद्यार्थी लॉगीनला परत आले आहेत. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे http://hams.mahait.org या पोर्टलवर 12 मार्च, 2026 पुर्वी अपलोड करुन अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करावेत, व त्याची हार्डकॉपी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील स्वाधार शाखेस सादर करावेत, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
*****
Comments
Post a Comment