देवणी येथे 4 मार्च रोजी महादेव यात्रेनिमित्त पशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्त पशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन लातूर, दि. 20 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी येथे गुरुवार, 2 एप्रिल 2026 रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पशुधन व कुक्कुट गटांची नोंदणी 2 एप्रिल रोजी प्रदर्शनस्थळी सकाळी 8.30 वाजता सुरु होईल व उद्घाटन ठिक 11 वाजता करण्यात येणार आहे. या पशु प्रदर्शनात देशी गोंवश (देवणी व लालकंधारी), संकरीत गोवंश, उस्मानाबादी शेळी, अश्व व कुकुट पक्षी मोठ्या संख्येने सहभागी होतात. सर्व पशुपालकांनी आपल्या जातीवंत पशुधनासह या भव्य पशु व पक्षी प्रदर्शनात सहभागी होवून यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवणी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. असे राहतील पशुधनाचे गट देवणी नर गट - 1) देवणी नर 1 वर्षाखालील वासरे गट 2) देवणी नर 1 वर्षावरील वासरे अदात गट 3) देवणी नर 2 दात वळू गट 4) देवणी नर 4 दात वळू गट देवणी मादी गट - 1) देवणी मादी 1 वर्षाखालील वासरे गट 2) देवणी मादी एक वर्षावरील वासरे गट 3) देवणी मादी गाभण कालवड गट 4) देवणी मादी गाभण गाय गट 4) देवणी मादी दुधाळ गाय दुधाळ गट लालकंधारी नर गट - 1) लालकंधारी नर 1 वर्षाखालील वासरे गट 2) लालकंधारी नर 1 वर्षावरील अदात गट 3) लालकंधारी नर 2 दात वळू गट 4) लालकंधारी नर 4 दात वळू गट 5) लालकंधारी नर 6 दात वळू गट लालकंधारी मादी गट - 1) लालकंधारी मादी 1 वर्षाखालील वासरे गट 2) लालकंधारी नर एक वर्षावरील अदात गट 3) लालकंधारी मादी गाभण कालवड गट 4) लालकंधारी मादी गाभण गाय गट 5) लालकंधारी मादी दुधाळ गाय गट संकरित मादी गट - 1) संकरित मादी 1 वर्षाखालील वासरे गट 2) संकरीत मादी एक वर्षाखाली वासरे गट 3) संकरित मादी गाभण कालवड गट 4) संकरित मादी दुधाळ गाय गट उस्मानाबादी शेळी गट- तीन व त्यावरील पिल्लांची शेळी अश्व नर गट व मादी गट , अदात, दोन दात वरील, कुक्कुट गट - 1) देशी कोंबडी गट 2) विदेशी कोंबडी गट श्वान गट - वर्गवारी निहाय *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित