'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत लातूरमध्ये जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांचा शुभारंभ; १० एप्रिलपर्यंत अर्जांचे आवाहन

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत लातूरमध्ये जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांचा शुभारंभ; १० एप्रिलपर्यंत अर्जांचे आवाहन लातूर, दि. २९ : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, या योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यासाठी ॲथलेटिक्स, कुस्ती, लॉन टेनिस आणि शूटिंग (नेमबाजी) या चार खेळांच्या अनिवासी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या केंद्रांमध्ये प्रवेशासाठी पात्र खेळाडूंनी १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी ३१ डिसेंबर २०२६ रोजी २१ वर्षांखालील वय असलेले मुले व मुली पात्र असतील. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमती पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच, शासकीय मान्यताप्राप्त डॉक्टरने दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असून खेळाडूने शालेय किंवा अधिकृत संघटनांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला असावा किंवा पदक प्राप्त केलेले असावे. निवड झालेल्या खेळाडूंच्या क्रीडा कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्तीची चाचणी घेतली जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना अनिवासी क्रीडा प्रशिक्षण, अत्याधुनिक क्रीडा सुविधा, साहित्य, खेळाडू कीट, तसेच देशांतर्गत व परदेशातील स्पर्धांसाठी येणारा खर्च, वैद्यकीय उपचार, विमा आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटर यांसारख्या उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष अथवा dsolatur@rediffmail.com या ईमेलवर १० एप्रिलपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा उदगीरचे तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे (मो. ९७६४०३२३३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित