लातूर येथे खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रात मानद तत्त्वावर कुस्ती मार्गदर्शक नियुक्तीसाठी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करा

लातूर येथे खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रात मानद तत्त्वावर कुस्ती मार्गदर्शक नियुक्तीसाठी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करा लातूर, दि. ९ : भारत सरकारच्या क्रीडा विभागाने देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये खेळांच्या विकासासाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे दर्जेदार खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच धोरणांतर्गत लातूर येथील खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्राला मिळाली आहे. या केंद्रासाठी कुस्ती विषयाचे मानद तत्त्वावर मार्गदर्शक (कोच) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता २० मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्गदर्शक पदासाठी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ऑलिंपिक, आशियाई खेळ, जागतिक अजिंक्यपद, किंवा संबंधित खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व पदक प्राप्त केलेले खेळाडू (प्रशिक्षण अनुभवासह), राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक (प्रशिक्षण अनुभवासह), एन.आय.एस. (NIS) पदविका धारक किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेव्हल कोर्स पूर्ण केलेले, राष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय खेळांमध्ये पदक प्राप्त केलेले खेळाडू (प्रशिक्षण अनुभवासह), राज्यस्तरीय खेळाडू, बी.पी.एड./एम.पी.एड. पदवीधर, किमान दहा वर्षांचा कुस्ती प्रशिक्षणाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्रे, खेळाचे प्रमाणपत्रे, प्रशिक्षण अनुभवाचे दाखले यांसह अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास