मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार लातूर, दि. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये मालमत्ता नोंदणीला मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आर्थिक वर्ष संपुष्टात येत असल्याने व नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला लोकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीकडे अधिक कल असतो. यामुळे दस्तऐवज नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, इष्टांक पूर्ती, अभिनिर्णय, कमी पडलेले मुद्रांक शुल्क वसुली इत्यादी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी या सुट्टीच्या दिवशीही कार्यालये कार्यान्वित राहतील. याशिवाय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, लातूर क्रमांक १ हे कार्यालय नियमितपणे शनिवार व रविवार सुरू असते. त्यामुळे या कार्यालयाची साप्ताहिक सुट्टी सोमवार व मंगळवार असते. परंतु मार्च अखेरच्या कालावधीत मंगळवार हा दिवसही कार्यालय सुरू राहील. सर्व संबंधित नागरिकांनी या सुधारित वेळापत्रकाचा लाभ घ्यावा व आवश्यक दस्तऐवज नोंदणीसाठी वेळीच कार्यालयात भेट द्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक जी. बी. सातदिवे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित