जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त मद्यविक्री बंद

जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त मद्यविक्री बंद लातूर, दि.20: जिल्ह्यात 21 मार्च, 2026 रोजी एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार मुस्लिम बांधवातर्फे रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत