विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा 31 मार्च रोजी लातूर जिल्हा दौरा

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा 31 मार्च रोजी लातूर जिल्हा दौरा लातूर दि. 30 : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार, दिनांक 31 मार्च, 2026 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सभापती प्रा. शिंदे यांचे सकाळी 10.45 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी 10.55 वाजता लातूर विमानतळ येथून शासकीय विश्रामगृह लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह लातूर येथे आगमन होईल व लातूर शहर जिल्हा भाजपच्यावतीने आयोजित स्वागत व सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून विष्णूदास मंगल कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, अंबेजोगाई रोड, लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.40 वाजता विष्णूदास मंगल कार्यालय येथे आगमन होईल व लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनगर समाजाच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा तसेच नूतन राज्यसभा सदस्य रामराव वडकुते व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परिक्षेत यश मिळविलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सभापती प्रा. शिंदे हे दुपारी 12.45 विष्णूदास मंगल कार्यालय येथून दिपज्योती नगर, एकता कॉलनी लातूरकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता दिपज्योतती नगर येथे आगमन होईल व श्री. अनिल गोयकर यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 1.45 वाजता दिपज्योती नगर येथून लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता लातूर विमानतळ येथून विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित