लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने ५ एप्रिल रोजी किनगाव येथे मोफत मेंदूविकार तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन

लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने ५ एप्रिल रोजी किनगाव येथे मोफत मेंदूविकार तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन लातूर, दि. ३१: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून मेंदूविकार असणाऱ्या बालकांसाठी मोफत तपासणी व औषधी वाटप करण्याची विशेष योजना जिल्हा परिषदेच्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीतून सन २०२५-२०२६ या वर्षात हाती घेण्यात आली आहे. या योजनेतंर्गत आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगजनांच्या मेंदूविकार आजारावर उपचार करण्यासाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ मेंदूविकार तज्ज्ञांमार्फत लाभार्थ्यांची मोफत तपासणी व उपचार करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तरी अहमदपूर, उदगीर व चाकूर परिसरातील मेंदूविकार असणाऱ्या लाभार्थ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास