परिवहन संवर्गातील वाहनांकरिता MH24- CF ही नवीन मालिका सुरु होणार

*परिवहन संवर्गातील वाहनांकरिता MH24- CF ही नवीन मालिका सुरु होणार* लातूर, दि. ०४ : परिवहन संवर्गातील वाहनांसाठी MH24- CF ही नविन मालिका सुरु होणार आहे. या अंतर्गत आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी ०६ मार्च २०२६ रोजी मोटार कार, मालवाहू वाहन, दुचाकी (ट्रान्सपोर्ट तीनचाकी वगळून), तसेच ०९ मार्च २०२६ रोजी ट्रान्सपोर्ट तीनचाकी वाहनांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यत अर्ज व विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डीडी) स्विकारण्यात येणार आहेत. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास या आकर्षक क्रमांकाचा लिलाव दिनांक ०९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता लातूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षामध्ये केला जाईल. या लिलावात संबंधीत अर्जदाराने वाढीव रक्कमेचा धनादेश सादर करणे बंधनकारक आहे. एखाद्या अर्जदाराने जास्तीचा वाढीव रक्कमेचा धनाकर्ष सादर केल्यास त्या अर्जदारास आकर्षक पसंती क्रमांक राखीव ठेवण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास