Posts

'कुणबी प्रमाणपत्रा'साठी लातूर जिल्ह्यात १० ते १७ सप्टेंबर दरम्यान महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन

'कुणबी प्रमाणपत्रा'साठी लातूर जिल्ह्यात १० ते १७ सप्टेंबर दरम्यान महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०८ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले असून, अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा दिनांक, वेळ व ठिकाण याची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर सूचना प्रसिद्ध करणे तसेच स्थानिक व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आयोजित शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवा...

लातूर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई; ३ हायवा जप्त करून साडेसात लाखांचा दंड प्रस्तावित

Image
लातूर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई; ३ हायवा जप्त करून साडेसात लाखांचा दंड प्रस्तावित लातूर, दि. ०८ (जिमाका) : लातूर तालुक्यामध्ये अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कारवाई केली आहे. लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस विभागाच्या पथकाने ०७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.२० वाजेच्या सुमारास मौजे खंडापूर येथील पाझर तलावातून अवैध गौणखनिज मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ३ हायवा वाहनांवर धडक कारवाई केली. या संयुक्त कारवाईदरम्यान वाहन मालक महादू ढोरमारे यांच्या मालकीचे MH-16,AY-9827, MH-24,BW-8080 आणि MH-24, CA-8080 या तिन्ही हायवा वाहनांना जप्त करण्यात आले असून, प्रत्येक वाहनावर प्रत्येकी २,५०,००० रुपये याप्रमाणे एकूण ७,५०,००० रुपयांची दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या तिन्ही प्रकरणात लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे. लातूर तालुक्यात आतापर्यंत अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी एकूण २२ ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. ०८ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे, औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह, अहमदपूर येथे मुलांची दोन व मुलींची दोन वसतिगृहे, तर रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह सुरू आहे. सदर वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन वेब लिंकचा वापर करावा. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून बिगर व्यावसायिक पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रवेश अर्ज भरता येईल. याशिवाय अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनाही वसतिगृह प्रवेशा...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.   या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६ स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ई-मेल : pune-examreformstaskforce@ maharashtra.gov.in नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६ स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर ई-मेल : na...

महापुरुषांचे विचार आणि कार्यापासून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

महापुरुषांचे विचार आणि कार्यापासून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील • अहमदपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन लातूर, दि. ०६ : महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके ही आपल्या सर्वांना सतत उर्जा व प्रेरणा देतात. नव्या पिढीने महापुरुषांचे विचार आणि कार्य यांचा आदर्श आपल्या जीवनात घेतला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक प्रखर राष्ट्रभक्त होते, तसेच त्यांचे लेखक म्हणून साहित्य क्षेत्रातही अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले. अहमदपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन सहकारमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हत्ते, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, नगरसेवक निलेश मजगे, अमित रेड्डी, निखिल कासनाळे, प्रशांत भोसले, आशिष तोगरे, अजिंक्य चामे, किशोर कोरे, राहुल शिवपुजे, मुजम्मिल सय्यद, सदामा शेख, युसुफ सय्...

नवीन पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जबाबदारी महत्वाची -सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

नवीन पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जबाबदारी महत्वाची -सहकारमंत्री बाबासाहेब पाटील लातूर, दि. ०७ : नवीन पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जबाबदारी अतिशय महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद येथे केले. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अहमदपूर यांच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील ४ अंगणवाडी सेविका व १५ मदतीस यांना सहकारमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, उपसभापती आयोध्या केंद्रे, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, जिल्हा परिषद सदस्य प्रफुलचंद्र गुंडरे, अश्विन नागराळे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी अस्मिता गायकवाड, बाल प्रकल्प विकास अधिकारी राजेश गझलवाड, महिला बाल प्रकल्प विकास अधिकारी विद्या लोमटे, ग्राम विकास अधिकारी प्रशांत घुगे, पंचायत समिती सदस्य रविंद्र बोडके, माधव सरवदे, सुरेखा मुंडे, आशिष तोगरे सह विविध मान्यवर उपस्थित होते. अंगणवाडी सेविका व मदतनीस यां...

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. ४ (जिमाका) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या विविध स्तरावरील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा संचालनालय स्तरावरून विकसित करण्यात आलेल्या https://sports.maharashtra.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे शालेय क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असणारी शाळांची नोंदणी, प्राथमिक प्रवेशिका, संलग्नता आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात या शालेय क्रीडा स्पर्धांची सुरुवात सप्टेंबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रस्तावित करण्यात आली असल्याने, तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली सर्व आवश्यक माहिती भरून तसेच विहित ऑनलाईन शुल्क अदा करून नोंदणी प्रक्रिया प...