लातूर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १३ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’आयोजन
लातूर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १३ ठिकाणी
पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’आयोजन
लातूर, दि. ०४ (जिमाका): देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभर एकाच दिवशी ५०० ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, तसेच शासन, उद्योग, आस्थापना आणि रोजगार इच्छुक युवक यांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी १३ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाकुंभामध्ये स्थानिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे तसेच इतर ठिकाणच्या नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. या रोजगार महाकुंभामध्ये १० वी, १२ वी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सर्व उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता दिलेल्या केंद्रांवर उपस्थित राहावे.
उमेदवारांनी सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम/बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो यांच्या किमान तीन प्रती घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यात १३ ठिकाणी आयोजन
लातूर जिल्ह्यात १३ केंद्रांवर रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे-
१. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाळा, क्रीडा संकुलासमोर, औसा रोड, लातूर
२. महिला बी.सी.ए. महाविद्यालय, आय.टी. पार्क जवळ, श्रीनगर एम.आय.डी.सी., लातूर
३. गुरूजी खाजगी आय.टी.आय., श्री श्री रविशंकर स्कूल जवळ, गेट नं. ७, वासनगाव रोड, लातूर
४. प्रचिती कॉम्प्युटर्स इन्स्टिट्यूट, अशोक हॉटेल चौक, यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, मेन रोड, लातूर
५. जन शिक्षण संस्था, पडिले कॉम्प्लेक्स, आंबेजोगाई रोड, लातूर
६. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रा. लि., ग्रामीण रुग्णालयाच्या विरुद्ध बाजूस, किल्लारी, ता. औसा,
७. साई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, रामनगर, बी.एस.एन.एल. ऑफिसच्या मागे, औसा
८. शहीद श्रीधर चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय आय.टी.आय. कॅम्पस, बिदर रोड, निलंगा
९. मल्हारराव होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय आय.टी.आय. कॅम्पस, लातूर रोड, चाकूर
१०. शिवाजी महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय कॅम्पस, रेणापूर
११. महात्मा गांधी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय कॅम्पस, अहमदपूर
१२. ममता गारमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट, मिरकले नगर, अहमदपूर
१३. राजीव गांधी आय.टी.आय. कॉलेज, जळकोट रोड, बोधन नगर, उदगीर
ऑनलाइन नोंदणी आणि पूर्वतयारी प्रशिक्षण
या रोजगार महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://www.mahaswayam.gov.in किंवा https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी. याशिवाय उमेदवारांच्या पूर्वतयारीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (लातूर शहर, मुलींची आय.टी.आय. लातूर, औसा, निलंगा, चाकूर, रेणापूर, अहमदपूर आणि उदगीर) दोन सत्रांत (७ ते १० सप्टेंबर २०२६ आणि २१ ते २४ सप्टेंबर २०२६) अभिमुखता व रोजगारपूर्व तयारी अभ्यासक्रम प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमात रोजगार मेळावा परिचय, करिअर जागरूकता, प्रभावी रिझ्युम/सीव्ही लेखन, मुलाखत कौशल्ये व मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्त्व विकास व संवाद कौशल्ये, कार्यस्थळ सज्जता आणि नियोक्त्यांच्या अपेक्षा यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. या उपक्रमाबाबत काही अडचण किंवा प्रश्न असल्यास उमेदवारांनी कार्यालयातील दत्तात्रय कांबळे (मो. ९०२८२३८४६५), लहू भंडारे (मो. ८०५५९९२९००) किंवा प्रवीण वाघमारे (मो. ९९२२९२५८९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री. सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment