लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा
सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, दि. ४ (जिमाका) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या विविध स्तरावरील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा संचालनालय स्तरावरून विकसित करण्यात आलेल्या https://sports.maharashtra.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे शालेय क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असणारी शाळांची नोंदणी, प्राथमिक प्रवेशिका, संलग्नता आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात या शालेय क्रीडा स्पर्धांची सुरुवात सप्टेंबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रस्तावित करण्यात आली असल्याने, तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली सर्व आवश्यक माहिती भरून तसेच विहित ऑनलाईन शुल्क अदा करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या क्रीडा स्पर्धांच्या नोंदणीबाबत किंवा इतर प्रक्रियेबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास क्रीडा अधिकारी धिरज बावणे (मो. नं. ८००७९०७७१३) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment