जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन लातूर, दि. ०२ (जिमाका) : शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी किंवा तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी किंवा अर्ज विहीत नमुन्यात, दोन प्रतींमध्ये संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर केलेल्या अर्जावर ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास किंवा तालुकास्तरीय लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास नागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल. लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन आयोजित केला जाईल. अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत