लातूर तालुका ग्रामीण भागातील मंडप तपासणीसाठी पथके गठीत
लातूर तालुका ग्रामीण भागातील मंडप तपासणीसाठी पथके गठीत
लातूर, दि. 3 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी एका वर्षासाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुका ग्रामीण क्षेत्रातील ध्वनी प्रदुषण विषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याठी सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव समारंभ या सर्व प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली.
लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन (ग्रामीण) पथक क्रमांक 01 कार्यक्षेत्रासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी (दूरध्वनी क्र. 02382-246211) भ्रमणध्वनी क्र. 9764528222, ई-मेल आयडी pslaturrular@gmail.com), बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनिल लाडके (भ्रमणध्वनी क्र. 8308376111, ई-मेल आयडी- ladkesd2801@gmail.com), बाभळगावचे तलाठी प्रशांत बिराजदार (भ्रमणध्वनी क्र. 9766010582, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) .
मुरुड पोलीस स्टेशन पथक क्रमांक 02 कार्यक्षेत्रासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे (भ्रमणध्वनी क्र. 9764040000, ई-मेल आयडी- psmurud405@gmail.com), मंडळ अधिकारी भुसनर डी.बी. (भ्रमणध्वनी क्र. 9028581622, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), मुरुडचे तलाठी गोपाळ शिंदे (भ्रमणध्वनी क्र. 9657679672, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com).
गातेगाव पोलीस स्टेशन पथक क्रमांक 03 कार्यक्षेत्रासाठी गातेगाव सहायक पोलीस निरीक्षक सचिन गडवे (भ्रमणध्वनी क्र. 9325787605, ई-मेल आयडी- psgategaon@gmail.com). गातेगाव मंडळ अधिकारी गणेश शिंगडे (भ्रमणध्वनी क्र. 9595262783, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com). गातेगाव तलाठी अमोल काळे (भ्रमणध्वनी क्र. 9604054067, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com).यांचा समावेश आहे. मंडप तपासणीसाठी गठीत करण्यात आलेली पथके आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना भेटी देवून तपासणी करतील, असे लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
**
Comments
Post a Comment