नवोदय विद्यालय इयत्ता नववी आणि अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
नवोदय विद्यालय इयत्ता नववी आणि
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
लातूर, दि. ०२ : नवोदय विद्यालय समितीमार्फत शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता ९वी आणि ११वी मधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट -२०२७ ची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विनामूल्य ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे. इयत्ता नववीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9 आणि इयत्ता अकरावीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 या पोर्टलवर नोंदणी करावी.
प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता, नियम व इतर विस्तृत माहिती असलेले माहितीपत्रक ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर उपलब्ध आहे. सर्व पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment