श्री गणेश उत्सवासाठी मिरवणूक वाहनांची तपासणी अनिवार्य; लातूरमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजनेतून सुविधा
श्री गणेश उत्सवासाठी मिरवणूक वाहनांची तपासणी अनिवार्य;
लातूरमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजनेतून सुविधा
लातूर, दि. ०९ (जिमाका) : येत्या १४ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लातूर शहरात श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान श्री गणेश स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश लातूर पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर, गणेश मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी आणि तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी याकरिता प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय 'एक खिडकी योजना' कार्यान्वित करण्यात आली आहे. याच ठिकाणी श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. याकरिता संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित अर्ज करावा. या अर्जासोबत वाहनाची सर्व वैध कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्ज सादर केल्यानंतर वाहन तपासणीच्या वेळी संबंधित पोलीस ठाण्यात किंवा लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रत्यक्ष वाहन हजर ठेवणे आवश्यक राहील, अशी माहिती लातूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली आहे.
*****
Comments
Post a Comment