कृषी विभागाची मोफत 'डिजिटल शेतीशाळा' शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आधुनिक शेतीचे धडे

कृषी विभागाची मोफत 'डिजिटल शेतीशाळा' शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आधुनिक शेतीचे धडे लातूर,दि.3 (जिमाका) : बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत 'डिजिटल शेतीशाळा' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (FPCs) यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या उपक्रमांतर्गत राहुरी, परभणी, दापोली आणि अकोला कृषी विद्यापीठांतील नामवंत कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना ऑनलाईन (Zoom आणि YouTube च्या माध्यमातून) मार्गदर्शन करणार आहेत. अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड अशा प्रतिकूल हवामानात पिके वाचवण्याचे तंत्रज्ञान, जीवामृतासारख्या जैविक निविष्ठांची निर्मिती आणि रासायनिक खतांचा खर्च कमी करण्याबाबत थेट प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या लाईव्ह सत्रादरम्यान शेतकरी शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे जागेवरच निरसन करून घेऊ शकणार आहेत. ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, सोमवार ते शनिवार दररोज विविध पिकांसाठी झूमवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बाजरी, सोयाबीन, ख. ज्वारी, कापूस, भुईमूग, भात, राजमा, मका, नाचणी, तूर-मूग-उडीद आणि भाजीपाला या प्रमुख पिकांवर संध्याकाळी ६.१५ आणि ७.३० वाजता तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा गटाच्या माध्यमातून झूम ॲपद्वारे (ID व Passcode वापरून) या सत्रात सहभागी होऊ शकतात. तसेच, 'कृषी विभाग महाराष्ट्र शासन' आणि 'पाणी फाउंडेशन' च्या अधिकृत युट्यूब (YouTube) व फेसबुक चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती किफायतशीर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. डिजिटल शेतीशाळेचे वेळापत्रक वार पीक वेळ झूम आयडी व पासकोड दर सोमवारी बाजरी सायं. 6.15 ते 7.15 ID: 89845701136 Passcode: 624786 सोयाबीन सायं. 7.30 ते 9.30 ID: 81549230008 Passcode: 012175 दर मंगळवारी ख.ज्वारी सायं. 6.15 ते 7.15 ID: 89024794378 Passcode: 237266 कापूस सायं. 7.30 ते 9.30 ID: 89186972779 Passcode: 502403 दर बुधवारी भुईमुग सायं. 6.15 ते 7.15 ID: 82646196818 Passcode: 935125 भात सायं. 7.30 ते 9.30 ID: 83942449675 Passcode: 445624 दर गुरूवारी घेवडा (राजमा) सायं. 6.15 ते 7.15 ID: 87366079713 Passcode: 626140 मका सायं. 7.30 ते 9.30 ID: 87531496031 Passcode: 437805 दर शुक्रवारी नाचणी सायं. 6.15 ते 7.15 ID: 89119960593 Passcode: 782580 तूर-मुग-उडीद सायं. 7.30 ते 9.30 ID: 81925640002 Passcode: 757471 दर शनिवारी भाजीपाला सायं. 7.30 ते 9.30 ID: 83989924758 Passcode: 689151 ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत