Posts

Showing posts from July, 2023

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

                                              शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 31 (जिमाका) :  राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. मात्र आता ही मुदत 3 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात आली असून अद्यापही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनी या कालावधीत आपल्या पिकांचा विमा उतरविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी, खंडित वीज पुरवता, खंडित इंटरनेट सेवा, तसेच पीएमएफबीवाय पोर्टलवरील तसेच इतर तांत्रिक व्यत्ययामुळे शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होताना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्र

तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने हृद्य निरोप

Image
  आयुष्यातले अविस्मरणीय क्षण लातूरने दिले ; लातूरची सेवा संस्मरणीय राहील - पृथ्वीराज बी. पी.   मागच्या काळातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणार ; लातूरच्या विकास कामाचा वारसा कायम ठेवू - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे   लातूर, दि. 31 (जिमाका) : आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मिळाले , लातूरमध्ये सेवा करताना आलेले अनुभव मला समृद्ध करणारे ठरले. लातूर जिल्ह्याने दिलेले प्रेम माझ्या आयुष्यात संस्मरणीय राहील, अशी हृद्य भावना नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली. त्यांच्या निरोप समारंभानिमित्त आणि नूतन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या स्वागत समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नूतन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे , जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , नूतन अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव , प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल , अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यावेळी उपस्थि

लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

लातूर, (जिमाका) दि. 31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यामध्ये लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा, यासाठी 1 ऑगस्टपासून ते 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.   महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्ट 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महसूल सप्ताहचे उद्घाटन होईल. 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद , 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा , 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद , 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी , 6 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता होईल.   महसूल सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे , लोकांची महसूल विषयक विविध कामे , सैनिकांची विविध कामे , यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपक्रमाचे आयोजन करून जनसहभागाद्वारे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. हे कार्यक्रम प्रत्येक तालुक्

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  लातूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था , सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी  विजयकुमार ढगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 1 ऑगस्ट 2023 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 15 ऑगस्ट 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.      या आदेशान्वये शस्त्रे , सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे , काठ्या , लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल , अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेत , आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा , गाणे म्हणणे , वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा , अंत्ययात्रा , विवाह , अधिकारी , कर्मचारी यांना लागू राहणार नाही , असे अधिसूचनेत नमूद करण्यात

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

                                     प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 31 (जिमाका) :  आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हा स्तरावर कृषि व अन्न प्रक्रिया संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी एक क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहायक (कृषि प्रक्रिया) नियुक्त करावयाचे आहे. या कंत्राटी पदासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातील अर्ज 9 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत ,  असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे. क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहायक (कृषि) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी (ऍग्री/हॉर्ट.), बी. टेक (फूड/ऍग्री) पदवी अनिवार्य आहे. फायनान्स, प्रोडक्शन मॅनेजमेंट, बिझनेसमधील एमबीए, एम.टेक (फूड), एम.एस्सी (फूड/ऍग्री/हॉर्ट) उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य राहील. एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच संगणकावर कार्यालयीन कामक

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्तीची होणार नेमणूक

                                          प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्तीची होणार नेमणूक लातूर, दि. 31 (जिमाका) :  आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी, सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करावयाची आहे. त्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातील अर्ज 14 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत ,  असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे. संसाधन व्यक्ती पदासाठी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबंधित पदवी किंवा पदविकाधारक व अनुभव असलेल्या व्यक्तींना प्रथम प्राधान्य राहील. या विषयातील पदवी अथवा पदविका असलेल्या मात्र अनुभव नसलेल्या व्यक्तींना द्वितीय प्राधान्य राहील. कृषि शाखेत पडावी असलेल्या आणि अन्नप्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य राहील. त्यानंतर सर्व प्रकारच्या

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर , दि.31 (जिमाका): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चांभार, ढोर, होलार, मोची या चार जातीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचे सन 2023-24 करिता उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. टी. जिभकाटे यांनी केले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचीत जाती वित व विकास महामंडळामार्फत मुदती कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेचा परतफेडीचा कालावधी 60 हप्त्यापर्यंत असून दोन लाखांपर्यंत कर्जाची 40 कर्ज प्रकरणे आणि पाच लाखांपर्यंत कर्जाची 2 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. सूक्ष्म पत पुरवठा (लघुऋण वित्त योजना) योजनेच्या परतफेडीचा कालावधी 3 वर्षे आहे. या योजनेतर्गत दोन लाखांपर्यंत 18 प्रकरणे आणि पाच लाखांपर्यंत 10 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. महिला समृद्धी योजना फक्त महिला लाभार्थ्यांसाठी असून यामध्ये 4 टक्के व्याजदराने कर्जप

विशेष वृत्त पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या खबरदारी ! · जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन

  विशेष वृत्त पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या खबरदारी ! ·          जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन लातूर , दि.31 (जिमाका): सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या काळात पिण्याचे पाणी दूषित होऊन कॉलरा , गॅस्ट्रो , कावीळ , अतिसार , हगवण , विषम ज्वर , पोलिओ यासारखे जलजन्य तसेच साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होवून डेंग्यू , मलेरिया , चिकनगुन्या यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशी घ्या खबरदारी पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे , अथवा निर्जंतुकीकरणासाठी ‘मेडिक्लोर’चा वापर करावा. बाहेरील असुरक्षित पाणी पिण्यास वापरू नये , घराबाहेर पडताना घरातील निर्जंतुक केलेले पाणी सोबत घ्यावे. पिण्याचे पाणी साठविण्यासाठी तोटीच्या टाकीचा वापर करावा अथवा पिण्याच्या पाण्याचे भांडे लहान मुलांच्या हाताला येणार नाही, याप्रमाणे उंचावर ठेवावे. पाणी घेण्यासाठी वगराळ्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात हात बुडविल्यास हातावरील रोग जंतू पाण्यात मिसळून पाणी दू

विशेष वृत्त ‘डोळे येणे’ संसर्गजन्य आजार, असा करा स्वतःचा बचाव !

  विशेष वृत्त ‘डोळे येणे’ संसर्गजन्य आजार, असा करा स्वतःचा बचाव ! लातूर, दि. 31 (जिमाका) : ‘डोळे येणे’ हा एक विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. विशेषतः पावसाळ्यात हा आजार पसरतो. डोळ्यांना खाज , चिकटपणा , सूज येणे , डोळे लालसर होणे , डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे यासारखी लक्षणे हा आजार झाल्यानंतर दिसून येतात. हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे आजारी व्यक्तींना विलगीकरणात ठेवावे. अशा व्यक्तींनी पूर्ण बरे झाल्याशिवाय इतरांचा संपर्कात जावू नये. ‘डोळे येणे’पासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी   डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. डोळ्यांना स्पर्श करून इतर व्यक्तींशी हस्तांदोलन करणे , वस्तूंना स्पर्श करणे , इतर व्यक्तींचा रुमाल , टॉवेल , कपडे इत्यादीने आपले डोळे पुसणे टाळावे. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. हात साबणाने वारंवार धुवावे. गॉगल अथवा चष्मा वापरावा. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा. नियमितपणे मास्कचा वापर करावा. तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. माशा , चिलटांमुळे हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी घ्यावी. जवळच्या शासकीय दवाखा

शासकीय मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

Image
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! ▪️जळकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ▪️घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश वितरित ▪️अतिवृष्टीने झालेल्या प्रत्येक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना ▪️मरसांगवी येथे बॅरेज उभारणीसाठी प्रयत्न करणार   लातूर, दि. ३० (जिमाका) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला जळकोट तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासनाने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार एन डी आर एफ निकषापेक्षा जास्त दराने ही मदत देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.  जळकोट तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रावणकोळा येथे शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री. बनसोडे बोलत होते. सरपंच सत्यवान पाटील, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय प्रमुख यावेळी उपस्थित होते. जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळ

पावसामुळे जळकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

Image
  लातूर, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकांचे , घरांचे नुसकान झाले असून जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे , मदत वाटप आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे , तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जळकोट तालुक्यातील काही भागात पुराचे पाणी घरात घुसून , तसेच घरांच्या पडझडीने नुकसान झाले आहे. तसेच या परिसरातील जनावरांचा मृत्यू , जमीन खरडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रावणकोळा , मरसांगवी , आतनुर आणि शिवाजीनगर तांडा येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. घरात पाणी घुसल्याने नुकसान झालेल्या   रावणकोळा येथील सागरबाई रावसाहेब पोले , पारुबाई भाऊराव पोले आणि राधा

शिरूर अनंतपाळक, चाकूर तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट

  ·         अनुसूचित जाती महिला लाभार्थ्याच्या निवडीसाठी अर्ज मागविले लातूर , दि. 25 (जिमाका) : सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यात शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अनुसूचित जातीच्या एका लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत औसा संबंधित पंचायत सामितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत , असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. एस. कदम यांनी केले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून लाभार्थ्याला शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 देय राहील.   उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज घेवून उभा करावी लागेल , असे डॉ. कदम यांनी कळविले आहे. *****

राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

  ·         राज्य शासनाकडून स्पर्धेचे आयोजन लातूर, दि. 28 (जिमाका) : 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पाच लाख रुपये, अडीच लाख रुपये आणि एक लाख रुपये असे परितोषिक देण्यात येणार आहे. तसेच राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 याप्रमाणे 36 शिफारसीत गणेशोत्सव मंडळापैकी 3 विजेते गणेशोत्सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळांचाही राज्य शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळानी मराठवाडा मुक्तिसंग्राम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पर्यावरण, वृक्ष लागवड अशा देखाव्यावर भर दिला तर लोकांचे प्रबोधन होईल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी असे देखावे तयार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

  लातूर, दि. 28 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृतम होत्सव उपक्रम गेली वर्षभर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाच्या सांगता समारंभात मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या सांगता समारंभानिमित्त ‘मेरी माटी-मेरा देश , मिट्टी को नमन- विरो का वंदन’ या शीर्षकाखाली लातूर जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत पातळीवर करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये 5 X 3 फुट या आकारात केंद्र शासनाच्या विहीत मापदंडानुसार आझादी का अमृत महोत्सव प्रितर्थ शिला फलकाची निर्मिती करण्यात येणार आहे. या स्मारक फलकाची निर्मिती शक्यतो अमृत सरोवर , ग्रामपंचायतीचा परिसर अथवा शाळेच्या आवारात करणे अप

विशेष वृत्त सततच्या पावसात खरीप पिकांची अशी घ्या काळजी ! ·कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  विशेष वृत्त सततच्या पावसात खरीप पिकांची अशी घ्या काळजी ! ·         कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन लातूर, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येवू शकतो. तसेच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण होवू शकते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी, याविषयी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. शेतात साचलेला पाण्याचा निचरा करावा- वापसा येताच बळीराम नांगराने चार ओळीनंतर सरी पाडून घ्यावी जेणेकरून यापुढील काळात शेतात अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही. अन्नद्रव्ये व्यवस्थापन - चराद्वारे शेतामध्ये साचलेले पाणी शेताबाहेर काढून देणे. मागील काही दिवसांत होत असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासोबतच जमिनी वापशावर येत नसल्यामुळे पिके जमिनीतील अन्नद्रव्ये घेऊ शकत नाहीत. यामुळेच सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. अशा परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे 19:19:19 , 50 ग्रॅम + सूक्ष्ममूलद्रव्ये ग्रेड-2