लातूर येथे ‘सारथी’च्या इमारतीचा 172 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

 

लातूर येथे ‘सारथी’च्या इमारतीचा

172 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

·         मुला-मुलींचे वसतिगृह, अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्राचा समावेश

लातूर, दि. 24 (जिमाका): छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) लातूर विभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी 172 कोटी 86 लाख 94 हजार 915 रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास शासनाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मुला-मुलींचे वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्रासाठी सभागृह बांधकाम व इतर अनुषंगिक बाबींचा समावेश आहे.

‘सारथी’साठी विभागीय कार्यालयासाठी लातूर तालुक्यातील वरवंटी येथील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेपैकी 1.60 हे.आर. जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी ‘सारथी’च्या विभागीय कार्यालयासह मुला-मुलींचे वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्रासाठी सभागृह बांधकाम करण्यासाठी उच्चाधिकार समितीने 172 कोटी 86 लाख 94 हजार 915 रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने 20 जुलै 2023 रोजी निर्गमित केला आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु