अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

 

अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी

प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

·        10 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार

लातूर, दि. 25 (जिमाका) : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषदशाळा व दिव्यांगांच्या शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या 18 जुलै 2023 रोजीच्या पत्रानुसार ही योजना राबविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.

अल्पसंख्यांक विभागाच्या 7 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी संस्था चालकांनी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव, शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग यांनी कळविले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु