प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

                                    प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत

कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 31 (जिमाका) : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हा स्तरावर कृषि व अन्न प्रक्रिया संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी एक क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहायक (कृषि प्रक्रिया) नियुक्त करावयाचे आहे. या कंत्राटी पदासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातील अर्ज 9 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेतअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.

क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहायक (कृषि) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी (ऍग्री/हॉर्ट.), बी. टेक (फूड/ऍग्री) पदवी अनिवार्य आहे. फायनान्स, प्रोडक्शन मॅनेजमेंट, बिझनेसमधील एमबीए, एम.टेक (फूड), एम.एस्सी (फूड/ऍग्री/हॉर्ट) उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य राहील. एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक आहे. इंग्रजी तथा मराठी टायपिंग अनिवार्य आहे.

या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 9 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत असून अर्जाच्या अटी व शर्तीनुसार लातूर येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु