सन 2022-23 साठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयात 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत § जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

 

सन 2022-23 साठी  जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी

जिल्हा क्रीडा कार्यालयात 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत

§  जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

लातूर दि.11 (जिमाका):- लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाच्या योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत जिल्हास्तरावर "जिल्हा क्रीडा पुरस्कार" देण्याची योजना कार्यान्वीत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे आपला परिपूर्ण अर्ज दिनांक 20 जुलै, 2023  पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. उशिरा येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

शासन निर्णय, शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा दि. 14 डिसेंबर 2022 च्या सुधारीत शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूरच्यावतीने सन 2022-2023 या वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग) तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी  प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

सदर पुरस्काराअंतर्गत लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त चार पुरस्कार देण्यात येतील. तसेच शासन निर्णयामध्ये नमुद आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना ज्यादाचा पुरस्कार गणल्या जाईल. यात गुणवंत खेळाडू पुरस्कार -०३ ( १ महिला, १ पुरुष व १ दिव्यांग) तसेच 01 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रुपये १० हजार फक्त या बाबींचा समावेश राहील.

या पुरस्काराकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.

अ) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरीता यामध्ये सतत १० वर्ष त्या जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य असले पाहीजे. तसेच गेल्या १० वर्षांत किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (खेलो इंडीया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते  खेळाडू तयार केले असतील, असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहिल. तसेच त्याने वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल.

(ब) गुणवंत खेळाडू पुरस्काराकरीता (पुरुष, महिला व दिव्यांग)  खेळाडू पुरस्कार वर्षसह लगत पूर्व ५ वर्षापैकी ०२ वर्ष त्या जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहीजे. सदर पुरस्काराचे वर्ष 1 जुलै ते 30 जुन या कालावधीमधील राहील.

वरील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांनी सदर पुरस्काराचा विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीकरीता तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड (मो.7972397130) व क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 44 खेळांचा विचार केला जाईल

धनुर्विदया, मैदानी क्रीडा स्पर्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस ॲण्ड स्नुकर, कॅरम, बुध्दीबळ, सायकलिंग, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, अश्‌वारोहण, लॉनटेनिस, मल्लखांब, नेमबाजी, स्केटिंग, जलतरण (डायव्हींग वॉटरपोलो) , टेबलटेनिस, ट्रायथलॉन, आटयापाटया, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, स्पोर्ट क्लाइंबिंग, मुष्ठीयुध्द, क्रिकेट, फुटबॉल, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कायाकिंग / कॅनोईग, खो-खो, भारोत्तोलन (पॉवरलिफ्टींग), रोईग, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, वजन उचलणे (वेटलिफ्टींग), कुस्ती (रेसलिंग), वुशू, यॉटींग, सॉफ्टबॉल, रग्बी, मॉडर्न पॅटॉथलॉन, बेसबॉल व स्क्वॅश  या खेळांचा जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु