“राष्ट्रीय सांख्यिकी दिना” निमित्त सहायक संशोधन अधिकारी एस.पी.बोदडे यांचा मुंबई येथे गौरव

 

राष्ट्रीय सांख्यिकी दिना” निमित्त  

सहायक संशोधन अधिकारी एस.पी.बोदडे यांचा मुंबई येथे गौरव

 

    लातूर,दि.5(जिमाका)- अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सांख्यिकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संपुर्ण महाराष्ट्रातून 250 नामनिर्देशने प्राप्त झाली होती. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने प्राप्त झालेल्या नामनिर्देशनातुन लातूर येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी संतोष पांडुरंगराव बोदड यांची पुरस्कारासाठी निवड करुन ग्रामविकास विभागाचेप्रधान सचिव एकनाथ डवले यांचे हस्ते सन्मानपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यांत आला.

महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अधिनस्त असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत दवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक 29 जून, 2023 हा दिवस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई येथे “ राष्‍ट्रीय सांख्यिकी दिन ” म्हणून साजरा करण्यांत आला. राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सांख्यिकी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच कार्यालयीन सांख्यिकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा मुंबई येथे संपन्न झाला.  

या कार्यक्रमास नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय  यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  अपिल व सुरक्षा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्रशिक्षणचे  प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी,  अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि पुणे हरीभाई व्ही.देसाई महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. मुंबई अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे  संचालक विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात पार पडला.

                                                              


 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु