चार वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत

 

चार वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत

n    *जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन*

 

लातूर दि.10(जिमाका) राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शासन निर्णय १२ नोव्हेंबर २०१३ अन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक व युवतींना व नोंदनीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे.

 यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या चार वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज १५ मे २०२३ पर्यंत मागविण्यात आले होते.

 परंतु आजपर्यंत फक्त एक पुरस्कार अर्ज प्राप्त झाल्यामुळे जिल्हास्तर युवा पुरस्कार अर्ज सादर करण्यास अंतिम मुदतवाढ देऊन २० जुलै, २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

सदरचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत, व अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, (मो.नं.९९७५५७६६००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु