वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विषेश मागास प्रवर्गानी योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा व्यवस्थापक झोंबाडे पी.एम.

 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विषेश मागास प्रवर्गानी योजनेचा लाभ घ्यावा

-          जिल्हा व्यवस्थापक झोंबाडे पी.एम.  

लातूर,दि.6 (जिमाका)-  सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विषेश मागास प्रवर्गातील लोकांकरिता योजना राबविल्या जात आहेत. यात वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजनेचे (IR-1)100, गट कर्जव्याज परतावा योजनेचे (IR-2) 02, बीज भांडवल कर्ज योजना 100, रूपये एक लाख थेटकर्ज योजना 200 असे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थीनी अर्ज करण्याकरीता व आधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, लातूर फोन. (02382) 299607 येथे संपर्क साधावा, असे अहवान जिल्हा व्यवस्थापक झोंबाडे पी.एम. यांनी केले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1)योजना

या योजनेमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख पर्यत आसून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विषेश मागास प्रर्वगातील असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बॅक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक  आहे. सदर योजना ही ऑनलाईन असुन या करिता आधार कार्ड, रहीवाशी दाखला, उत्पन्नाचे प्रमानपत्र, जातीचा दाखला शाळेचा दाखला संबधीत व्यावसायचे कोटेशन व प्रकल्प अहवाल, WWW.VJNT.IN वेबसाईटवर मूळ कागदत्रासह अपलोड करणे आश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-2)

करिता कर्जाची मर्यादा रू.10 लाख ते रू.50 लाखा पर्यत आसून या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता, नोंदनीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा, गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

 गटातील सर्व सदस्याचे सिबिल क्रेडिटस्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉनक्रिम्रीनल, करिता 8 लाखाच्या मर्यादीत असावी सदर योजना या  ऑनलाईन योजना आसून या करिता सदस्याचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी, आधारकार्ड, शाळेचा दाखला, संबधीत व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.  

रूपये एक लाख थेटकर्ज योजना

या योजनेमध्ये महामंडळाकडून रू.1 लाख थेट कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामिनदार व बोझा नोंद करून देणे महत्वाचे आसून या करिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यत मर्यादा) रेशनकार्ड, आधारकार्ड, रहिवाशी इत्यादी कागद पत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे या योननेचे फॉर्म महामंडळातून जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास मिळेल.

बीज भांडवल योजना

बीज भांडवल योजना ही बॅकेमार्फत राबविली जात आसून अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्र जोडून कार्यालयास दाखल करणे महत्वाचे आहे. या पूर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला आसल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु