बार्टी पुणे व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जुलैला तालुका व जिल्हास्तरीय ॲट्रोसिटी प्रशिक्षण कार्यशाळा

 

बार्टी पुणे व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

14 जुलैला तालुका व जिल्हास्तरीय ॲट्रोसिटी प्रशिक्षण कार्यशाळा

 

लातूर दि.11 (जिमाका):- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम  2016, बाबत बार्टी, पुणे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रशिक्षण संस्था) व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका व जिल्हास्तरीय एक दिवसीय अॅट्रॉसिटी प्रशिक्षण कार्यशाळा दि. 14 जूलै, 2023 रोजी सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्केट यार्ड, शिवनेरी गेट समोर, डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड, लातूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर यांनी कळविले आहे.

          या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्ह्यातील ॲट्रोसिटीचे कामकाज पाहणारे जिल्हा सरकारी वकील जिल्हा सत्र न्यायालय लातूर, जिल्हा माहिती अधिकारी लातूर, जिल्हा शैल्य चिकित्सक लातूर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद लातूर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद लातूर, सहायक पोलीस निरिक्षक, (नाहसं) मा. उपविभागीय अधिकारी सर्व, मा. तहसिलदार सर्व, उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती जि. लातूर या शासकीय कार्यालयातील  अधिकारी / कर्मचारी तसेच उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीमधील सर्व सन्माननीय शासकीय व अशासकीय सदस्य यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील समाज कल्याण निरिक्षक संदेश घुगे (मो.  9405446216) यांच्याशी संपर्क साधावा.       

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु